HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळला आता तिसरी आणि चौथी लाटही येणार!

नागपूर | संपूर्ण जग, देश आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने होरपळून निघत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सज्ज राहा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी आज नागपुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी कमी होत असली तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने देखील आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे, असं गडकरींनी सांगितलं आहे.

कोरोना विरुद्धची ही कठीण लढाई आपण लढत असताना एकमेकांना मदत आणि सहाय्य करून परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. आपला आत्मविश्वास ढळू न देता अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये काम करावं लागतं आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच ! | सर्वोच्च न्यायालय

News Desk

महाविकासआघाडीचा ३६० डिग्री अनुभव महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेल!

swarit

“मोदींनी देशात योग्य नियोजन केलं असतं तर…”, बच्चू कडूंचे केंद्रावर टीकास्त्र

News Desk