मुंबई | संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दाटीवाटीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळणे हे मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीत देखील सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आजच्या (२८ एप्रिल) दिवसात धारावीत ४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३३० वर पोहोचला असून कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या १८ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
4 deaths and 42 new #COVID19 positive cases have been reported in Dharavi area today. Total positive cases in the area stand at 330 & death toll rises to 18: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra
— ANI (@ANI) April 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.