HW News Marathi
महाराष्ट्र

“भगवान रामाप्रमाणे भविष्यात मोदींना पुजले जाईल”, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याचा दावा

नवी दिल्ली| त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण? अशी चर्चा उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानंतर अनेक नावांचीही चर्चा सुरू होती. परंतु चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांच्या हाती उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. काल (१४ मार्च) ऋषिकुल येथील सरकारी पीजी आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित ‘नेत्र कुंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री रावत हे हरिद्वारमधील कुंभ मेळ्यासंदर्भातील कार्यक्रमात भाषण देताना मोदींवर स्तुतीसुमनं उधळत होते. एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. आज मात्र भारताची परिस्थिती आणि गोष्टींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा इतर देशांचे राष्ट्रध्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहतात, असं रावत म्हणाले. सध्या रावत हे पौडी लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत. जनतेचं काम करणारे लोकप्रितिनिधी म्हणून मोदींनी जनतेवर कधीही न पुसता येणारी छाप सोडल्याचं प्रशस्तीपत्रकही रावत यांनी मोदींना दिला. मोदींच्या कामाकडे पाहूनच मोदी है तो मुमकिन है असं म्हटलं जातं, असंही रावत म्हणाले.

ज्याप्रमाणे द्वापर युगामध्ये भगवान श्री राम आणि त्रेता युगामध्ये भगवान श्री कृष्णाने आपल्या कर्मांमुळे समाजामध्ये मान सन्मान मिळवला आणि देवत्व प्राप्त केलं त्याच प्रकारे येण्याऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रमाणे पूजा केली जाईल, असंही आपल्या भाषणात रावत म्हणाले. मागील आठवड्यामध्येच तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोमवारी (८ मार्च ) राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली होती. याच पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याजागी तीरथ सींह रावत यांची वर्णी लागलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ नेत्याचे आडनाव ठाकरे नसते तर…!

News Desk

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात!

News Desk

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Aprna