HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraElections2019 : नक्षलवादाला न जुमानता गडचिरोलीत ५२ टक्के मतदान

गडचिरोली | राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरू आहे. राज्यात २८८ जागांसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान सुरू आहे. राज्यातील नक्षलवाद ग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदान दुपारी ३ वाजता पूर्ण झाले. गडचिरोतील ५२ टक्के मतदान झाले असून या नक्षलग्रस्त परिसर असल्यामुळे सुरक्षिततेच्या काणास्तव गडचिरोलीमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदानापूर्वी या भागातील काही नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे बॅनर लावण्यात आले होते. गडचिरोलीमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत सररासरी ५०. ८७ टक्के मतदान झाले.

तसेच लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीमध्ये अंदाजे ७० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. गडचिरोलीचा भाग संवेदनशील असल्यामुळे ५ हेलिकॉप्टर लावून मतदान पथकांना वेगवेगळ्या २० कॅम्पपर्यंत पोहोचवण्यात आले. यानंतर ही मतदान पथक चालत किंवा छोट्या वाहनांनी आपल्या मतदान केंद्रापर्यंत आली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील १० हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार

News Desk

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत! – धनंजय मुंडे

Aprna

डिजिटल जनगणनेत ओबीसींचीही जनगणना करा | छगन भुजबळ

News Desk