HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी १-१ कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर | कोरोनाबाधितांचा आकडा चढत्या क्रमातच आहे. कोल्हापूरात कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला आहे. कसबा बावडायेथील मराठा कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून कोल्हापूरात आता भीतीचे आणखीनच वातावरण पसरले आहे. तसेच, नाशिकमध्येही दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. दिल्लीहून नाशिकला आलेल्या ४४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागम झाल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २ झाली आहे.

कोरोनाबाधित महिलेवर याआधी न्युमोनियावर उपचार सुरु होते. १५ दिवसांपूर्वी साताऱ्याहून ही महिला कोल्हापूरला आली होती. कोरोनाची काही लक्षणे आढळल्यानंतर तिच्या घश्याती द्राव्य मिरजेला तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्या रिपोर्टनुसार तिला कोरोना झाल्याचे लक्षात आले. तात्काळ महिलेल्या घरच्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. तसेच, ती राहात असलेल्या परिसर सील करण्यात आला असून त्या काळात ती कोणाच्या संपर्कात आली याचा शोध सुरु आहे.

Related posts

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk

अजित पवारांनी शरद पवारांसमोर पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळांचे तोंड भरून केले कौतुक

News Desk

महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचा मुहूर्त लांबणीवर

News Desk