HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

गेल्या २८ दिवसांमध्ये देशातील १५ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशात जरी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरीही दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दिलासादायक गोष्टी देखील पुढे येत आहेत. आज (२४ एप्रिल) झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देखील दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. देशातील १५ जिल्ह्यात गेल्या २८ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर देशातील ८० जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर देखील २०.५७ टक्के झाल्याचीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे देशात कोरोनाचा संसर्गात समूहात व्हायला सुरुवात झाली आहे का ? याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आता जिल्हा आणि राज्य स्तरावर सामूहिक तपासणीला सुरुवात केली जाणार असल्याचेही आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २३,०७७ वर पोहोचला असून तर मृतांचा ७१८ इतका झाला आहे. सद्यस्थिती देशात १७,८१० रुग्णांवर विविधी रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १,६८४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दिलासादायक म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी ४,७४९ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत”, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी देण्यात आली आहे.

Related posts

निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आंबेडकरांविरोधात गुन्हा

News Desk

आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रत्येकी २ कोटींचे आमिष !

News Desk

#Vidhansabha2019 | येत्या ८ तारखेला दसरा मेळाव्यात सर्व काही बोलेन !

News Desk