HW News Marathi
Covid-19

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबई | राज्यात काल ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल (१ जून) कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण संख्या आता ७० हाजर ०१३ अशी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे.काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १).

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. काल नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे.

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत.

राज्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणात वाढ

  • मार्च महिन्यात ३०२ पैकी ३९ असे १२.९१ टक्के रुग्ण बरे झाले होते.
  • एप्रिल महिन्यात १०,४९८ पैकी १७७३ असे १६.८८ टक्के रुग्ण बरे झाले.
  • मे महिन्यात ६७,६५५ पैकी २९, ३२९ असे एकूण ४३.३५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
  • राज्यातील मृत्यूदर ३.३७ टक्के आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्याल ?”, मुख्यमंत्री म्हणाले…

News Desk

नाशिकमध्ये बुधवारपासून कडक लॉकडाऊन, महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

News Desk

पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी

News Desk