HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्याही १० हजारावर पोहोचली

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. राज्यात आज (३० एप्रिल) कोरोना बाधितांच्या संख्येने १० हजारावर पोहोचली आहे. यामुळे राज्यात भिती आणि चिंता वाढू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला होता. राज्यातील दोन शहरे मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंता वाढू लागली आहे

“ससून हॉस्पिटलमध्ये ७ अत्यवस्थ रुग्ण आणि एक अवघे ४ महिन्यांचे बाळ कोरोनामुक्त झाल्याची बातमी अतिशय दिलासा आणि नवी उमेद देणारी आहे. ससून हॉस्पिटलच्या आरोग्य व्यवस्थापनाने प्रामाणिकपणे बजावलेल्या कर्तव्याचे हे फळ आहे,” असे ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. दुसरीकडे मालेगावमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २५३ वर पोहोचली असून नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २७६ झाली आहे.यात १३ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुझ्या बापाला” हे ट्विट मी नव्हे तर एका संतप्त शिवसैनिकाने केले ! महापौरांचे स्पष्टीकरण

News Desk

मोदी आणि जो बायडन यांच्यात फोनवरुन ‘या’ विषयावर झाली चर्चा…

News Desk

चिंताजनक ! देशात एका दिवसात कोरोना रुग्णसंख्येने पार केला १ लाखांचा आकडा 

News Desk