HW News Marathi
Covid-19

पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९० टक्क्यांवर

मुंबई। पुणे विभागातील आतापर्यंत १० हजार १५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९० टक्के आहे. तर,पुण्यात कोरोना मृत्यू दर ४.५१ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज (१८जून) दिली.

दरम्यान, सध्या पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८९३ तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५ हजार २१ इतकी आहे. पुणे विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित ७१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, २५४ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यात सध्या १२ हजार ३८९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७ हजार ९२२रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३ हजार ९५२आहे. कोरोनाबाधित एकूण ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, २५४ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९४ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ४.१६ टक्के इतके आहे. कालच्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ३३० ने वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने ‘या’ संकटाचा सामना करण्याची वेळ !

News Desk

परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार- अजित पवार

News Desk

महागाई भत्त्याला स्थगिती देण्यापेक्षा बुलेट ट्रेनच्या प्रकल्प रद्द का नाही केला?

News Desk