HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील आरोग्य विभाग पूर्णपणे सक्षम, मोठ्या प्रमाणात बेड्सची उपलब्धता !

पुणे | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकड्यात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. अनलॉकनंतर या शहरांची स्थिती कशी आहे याबाबत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी एच.डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी आज (१२ जून) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. “पुण्यातील आरोग्य विभागाचे हे यश आहे कि, शहरात पुण्याचा पहिला रुग्ण सापडण्याचा आधीपासून अगदी आतापर्यंत पुण्यात आरोग्य विषयक सर्व सोयी-सुविधा अगदी सक्षम आहे”, असा दावा महापौर मोहोळ यांनी केला आहे. दरम्यान, यावेळी मोहोळ यांनी पुण्यातील कोरोनास्थितीबाबत नेमके काय भाष्य केले आहे ? जाणून घ्या

पुण्यात बेड्सची कमतरता बिलकुल नाही !

“पुण्यातील आरोग्य विभागाचे हे यश आहे कि, शहरात पुण्याचा पहिला रुग्ण सापडण्याचा आधीपासून अगदी आतापर्यंत पुण्यात आरोग्य विषयक सर्व सोयी-सुविधा अगदी सक्षम आहे. मग क्वारंटाईन, आयसोलेशनची सुविधा असो, किंवा आयसीयू, सीसीसी व्यवस्था असो सगळ्यासाठी पुण्यातील यंत्रणा, आरोग्य विभाग सक्षम आहे. खाजगी आणि शासकीय दोन्ही रुग्णालयांकडून चांगले काम. आज पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या फक्त २,५८२ इतकी आहे. मात्र, पुण्यातील बेड्सची उपलब्धता जर पाहिली तर ती तब्बल १५,५०० इतकी आहे. त्यामुळे, पुण्यात बेड्सची कमतरता बिलकुल नाही”, असा स्पष्ट दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

सद्यस्थिती पुण्यात सार्वजनिक वाहतूक सुरु करणे परवडणारे नाही !

“पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणे आता तरी आपल्याला परवडणारे नाही. मात्र, पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने सार्वजनिक वाहतूक सुरु करण्याचे सध्याचे धोरण आहे. कारण, आता सार्वजनिक वाहतूक सुरु केली तर गर्दी आणि संसर्ग आपण रोखूच शकत नाही. त्यामुळे, विशेषतः त्यातही काही बदल करणे अपेक्षित आहे. ठराविक बस स्टॉप, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन, सीट्स कमी पण बसच्या फेऱ्या जास्त असे अनेक उपाय शोधून त्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरु करता येईल. येत्या काळात आपण ती सुरु करूच मात्र सद्यस्थितीत तसा कोणताही विचार नाही”, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

पहा संपूर्ण मुलाखत :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात झाली चोरी 

News Desk

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; ८ सुवर्णासह ३० पदकांची कमाई

News Desk

अपयश झाकण्यासाठीच सरकारकडून मुद्द्यांना बगल

News Desk