HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील, काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं त्याची चर्चा करू – संजय राऊत

पुणे | राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, या बद्दल त्यांनी आज सूतोवाच केलं. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज(२० फेब्रुवारी) पुण्यात सांगितलं आहे.

ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा” असे संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु” असे संजय राऊत म्हणाले. एकत्र निवडणुकूच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले असा प्रकार केंद्राने करून ओबीसींची शुद्ध फसवणूक केली’ -शरद पवार

News Desk

पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे ते हताश असतील; पडळकरांचा शरद पवारांना टोला

Aprna

पालघरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, वोटिंग मशीनमध्ये बिघाड

News Desk