HW News Marathi
Covid-19

पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी लष्कराची मदत घेणार

पुणे | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आली आहे. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे.

पुण्यात सध्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील लष्कराचं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलीय. लष्कराच्या रुग्णालयात ICU बेडसह अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. पुणे प्रशासनानं लष्कराकडे रुग्णालय उलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. आज संध्याकाळपर्यंत लष्कराकडून उत्तर येण्याची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लष्करानं जर आपलं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करुन दिलं, तर कोरोना संकटात पुणे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रुग्णांसाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात बेड्स कमी पडत आहेत. पुण्यात गेल्या १५ दिवसांत दररोज चार हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठीच्या बेड्सची संख्या कमी झाली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या असून या ठिकाणी १८० बेड्स उलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुबी रुग्णालयाशिवाय पुण्याच्या सरकारी रुग्णालय आणि इतर रुग्णालयात बेडसची झपाट्याने कमतरता जाणवत असल्याचं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक : राज्यात आज कोरोना रुग्णांचा उद्रेक!

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाची नोंद

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता कोरोनासंदर्भात देशाला संबोधित करणार !

Arati More