HW News Marathi
महाराष्ट्र

“मला माझं वय ४५ वर्षांच्या पुढे का नाही याची खंत वाटतेय!”

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. प्रत्येक विषयावर त्यांचे असे वेगळे मत असतेच. आताही त्यांनी कोरोना लसीच्या बाबतीत एक ट्विट केले आहे. अमृता यांच्या या एका ट्विटची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतं आहे. “मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय ४५ वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे” असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी हे ट्विट केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अमृता फडणवीसांचा उल्लेख केला होता. “माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं”, असं भाई जगताप म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांचा चांगलाच तिळपापड झाल्याचं त्यांनी केलेल्या ट्वीटवरून दिसून आलं होतं.

भाई जगताप नेमकं काय म्हणाले होते?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.

अमृता फडणवीसांनी काय उत्तर दिलं होतं ?

भाई जगतापांच्या सवालाने व्यथित झालेल्या अमृता फडणवीसांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.त्यांनी ट्विट केले आहे की, ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय !’

भाई जगतापांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत तसेच सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या होत्य.त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत असताना भाई जगताप यांनी आपल्या डॅशिंग अंदाजात अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 कराड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या ६० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

News Desk

मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी 200 कोटी, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

News Desk