HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात इंजिनिअरसह पत्नी, मुलगा मृतावस्थेत

पुणेः आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी अभियंत्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. जयेशकुमार पटेल (34) असे इंजिनिअरचे नाव, तर पत्नीचे नाव भूमिका पटेल (वय 30) आणि 4 वर्षीय मुलाचे नाव नक्ष आहे. जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. महिन्याला दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीस होते, तर पत्नी गृहिणी होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री 11 वाजता माहिती दिली. चतुरशृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पोलिसांनी पटेल यांच्या घराजवळ पोहचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी पूर्ण कुटुंब मृत्य अवस्थेत आढळून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्या कार्यकर्त्यासाठी भाजप रस्त्यावर, संजय राऊतांचा भाजपला टोला

News Desk

अ कृषी जमिनीसाठीची अट शिथिल

News Desk

२५ वर्षांनंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास!

News Desk