HW Marathi
महाराष्ट्र

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ५ जणांना अटक

सोलापूर | गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. हिंगणघाट जळीत कांड प्रकरण ताजे असताना राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात विजापूर परिसरात एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकासह १० जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. यातील बहुतांश आरोपी रिक्षाचालक आहेत.

तरुणी सोलापुरातील एका कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ पीडित मुलगी रडत बसली होती. एका स्थानिक नागरिकाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीला पोलीस स्थानकात आणून तिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने या बद्दल माहिती दिली. काही दिवसांपासून काही तरुण पीडित मुलीला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले. पोलीसांना या घटनेची माहिती कळताच तपासाची चक्रे फिरवली.

पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच कारवाई करून पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अन्य आरोपीची माहिती घेतली जात असून पोलीस पथके शोधासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणातील बहुतेक आरोपी रिक्षाचालक असल्याचे समजते. आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ (ड), पॉस्को आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Related posts

बांधकाम व्यावसायिक डिएसकें विरोधात ३६,८७५ पानांचे आरोपपत्र दाखल 

News Desk

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डीत आजपासून बेमुदत बंद

अपर्णा गोतपागर

‘फेक न्यूज’ दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द

News Desk