HW News Marathi
Covid-19

सोलापुरात कोरोनाने पार केली शंभरी, तब्बल २१ नव्या रुग्णांची नोंद

सोलापूर | सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सोलापूरात आज (३० एप्रिल) २१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे आता सोलापूरची कोरोनाबाधितांची आता संख्या १०० पार गेली आहे. तर दुसऱ्या बाजुला दिलासादायक बातमी म्हणजे सोलापुरात एका कोरोनाबाधित महिलेसह तिच्या दोन लहान मुलांनी कोरोनावर मात केली आहे. या महिलेला आपल्या मुलांसह रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या महिलेच्या दोन लहान मुलांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्या दोघी मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ही महिला आणि तिच्या दोन लहान मुलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आला. यानंतर १४ दिवसांच्या कालावधीनंतर महिला आणि लहान मुलांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटव्ह आला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लसीकरणासाठी आता ‘कोविन’ ॲपची सक्ती रद्द!

News Desk

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्येचं ४० वर्षीय महिलेचा बलात्कार

News Desk

लाॅकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटली तरी अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली जाऊ नये !

News Desk