HW News Marathi
महाराष्ट्र

‘२०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा आमदार हा भाजपाचा असेल आणि तो…’, फडणवीसांचा ईशारा!

मुंबई। देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आशाताईंचा भाजपामध्ये प्रवेश होत आहे. याला पुनर्प्रवेश म्हणायचं की स्वगृही प्रवेश म्हणायचं हा प्रश्न आहे. पण त्या घर सोडून गेल्या नव्हत्या. भाजपाचे मुंबईमध्ये काम करतांना आपल्या गावी गेल्यानंतर तो सर्व भाग तेव्हाच्या युतीमध्ये शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी शिवसेनेचं काम केलं. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्या म्हणून त्यांनी आपला जम बसवला. जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी आपली प्रतिमा तयार केली. विधानसभेच्या तीन निवडणुका त्या लढल्या आणि तिन्हीवेळी घात झाल्यामुळे विधानसभेवर त्या निवडून जाऊ शकल्या नाहीत. जनतेच्या मनामध्ये त्यांना निवडून द्यावं, असं होतं. मात्र त्यावेळी राजकीय गणितं त्यावेळी वेगळी बसवण्यात आली.”

२०२४ चं तिकीट द्याल का, अस आशाताईंनी विचारलं नाही

फडणवीस म्हणाले, “आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की, २०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा आमदार हा भाजपाचा असेल आणि तो आमदार आशाताई बुचके असतील. पक्षप्रवेशाच्या चर्चेवळी मला २०२४ चं तिकीट द्याल का, अस आशाताईंनी विचारलं नाही. त्यासंदर्भात आग्रह धरला नाही. फक्त कार्यकर्त्यांना भाजपामध्ये सन्मानाची जागा मिळेल की नाही, स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळेल की नाही, ऐवढा त्यांचा प्रश्न होता. मी त्यांना आश्वस्त केलं भाजपामधे आतला-बाहेरचा, जूना-नवा, असा काही विषय नाही.”

आमचाही श्वास कोंडत होता

महाराष्ट्रात तिन पक्ष सत्तेत आल्यानंत ही आमच्यासाठी सुवर्णसंधी होती. जसा आशाताईंचा श्वास कोंडत होता तसा आमचाही श्वास कोंडत होता. अनेक ठीकाणी आम्हालाही समजत नव्हत की पक्ष वाढवायचा आहे. कार्यकर्ते तयार होते. पण त्यांना वाढायला स्कोप मिळत नव्हता. कारण त्या ठीकाणी आपले मित्रपक्ष होते आणि युतीमध्ये हे होतंच असतं. मात्र आता तिन पक्ष एकत्र झाले आणि आता त्यांचा श्वास कोंडायला लागला आहे. त्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घ्यायला जागा मिळाली. आपण राज्यभर मोकळा श्वास घेत काम करु आणि २०२४ मध्ये भाजपा स्वत:च्या भरवशावर सत्तेत येईल.”, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकासआघाडीला अखेर सुबुद्धी झाली”, फडणवीसांचा ‘या’ कारणावरुन सरकारला टोला

swarit

सुजय विखे-बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

BMC चा कारभार पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याची भाजपच्या आमदाराची मागणी

Aprna