HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने राजकीय वातावरण चिघळलं आहे. इतकंच नाही तर नाशिक आणि ठाण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केली. नाशिक पोलीस आणि पुणे पोलिसांचं पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कोकणात रवाना झाले आहेत.मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती, असं टोकाचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात त्यांचं मत दिलं आहे.

चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे

राज ठाकरे यांनी या प्रकरणात त्यांचं मत दिलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघात काहीकाळ चर्चा झाली . राज्यातील आजच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा झाली. जे काही सुरू आहे ते व्हायला नको होतं, चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती. राज ठाकरे सध्या तरी या विषयावर अधिकृतपणे बोलणार नाहीत, अशी माहित समोर येत आहे.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही

नारायण राणे यांनी गुन्हा दाखल केल्यावर आता नारायण राणेंनी त्यांच मत स्पष्ट केलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला आहे.

दगडफेक करण्यात पुरुषार्थ नाही

माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा कोण शिवसेना. एखाद्या नेत्याचं नाव सांगा. कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही. माझी बदनामी करायला घेतली तर माझा गुन्हा तुमच्याविरोधात दाखल करणार आहे. मी सारखं पाहतो. हे निघालं ते निघालंय… काय चाललं नाही. मी तुमच्या बातमीवर, सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारले हा पुरुषार्थ होत नाही. त्यांना जे काही करायचं ते करू दे. काय पुरुषार्थ आहे ते पाहू, असंही ते म्हणाले.

मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?

नारायण राणे यांनी या सगळ्या प्रकरणात त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं राणे म्हणाले आहेत.

मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

News Desk

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा !- नाना पटोले

News Desk

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन

Aprna