HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम निर्बंधमुक्त; गणपती मुर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवली!

मुंबई | गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सण, उत्सवाला मर्यादा होत्या. यंदा गणेशत्सव, दहीहांडी, मोहरम आणि इतर जे काही सणाला कोणत्याही मर्यादा आणि निर्बंध नसणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर केली आहे. मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (21 जुलै) दुसरी कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सण आणि उत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतल्याचे पत्रकार परिषदेतून दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, “गणेश उत्सवासाठी मंडपासाठी काही परवाना हव्या असताता, ते सुटसुटीत होण्यासाठी मंडळांना खेटे घालायला लागू नये. म्हणून एक खिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही क्लिष्ट अटीशर्ती नको, तात्काळ त्यांना किंवा कोणी जे मंडळाचे अधिकारी नोकरी आणि धंदे संभाळून सर्व कामे करत असतात. यासंदर्भात सर्व निर्णय दिलेले आहेत. गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागू नये. या सर्व प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. हा उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी समाज प्रबोधन आणि नियमाचे पालन केले पाहिजे. मुंबईत जी नियमावलीप्रमाणे राज्यभर तशाच प्रकारच्या अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे कोव्हिडमुळे गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा होती. ती मर्यादा यावेळेस काढून टाकलेली आहे. उत्सहामध्ये जल्लोषामध्ये गणेश उत्सव लोकांचा साजरा करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.”

  मार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना  

गेली दोन वर्ष कोरोनामुळे सर्व सण, उत्सवावर मर्यादा आणि निर्बंध होत्या. त्यामुळे इच्छा देखील आपल्याला उत्सव साजरे करता आले नाही. या उत्सवावर मर्यादा होत्या. परंतु, या वर्षी मात्र, सर्व मंडळाचा उत्साह आणइ गेल्या दोन वर्षाची जी काही मर्यादा लक्ष्यात घेऊन, गणेशोत्सव, दहीहांडी आणि मोहरम हे सगळे महाराष्ट्रातील सण ते उत्सहात साजरे झाले पाहिजे. यात समजा प्रमबोधन असेल, ऐक्याचे दर्शन असेल या सर्वबाबती चर्चा झाली. यात कायदा सुव्यवस्था राखून शांततेने हे निर्णय उत्सहात साजर झाले पाहिजे यासाठी सर्व प्रशासन आणि पोलीस प्रशासना सूचना दिल्या पाहिजे. जिल्हा प्रमुख्यांना देखील सूचना दिल्या आहेत. गणेशत्सव, दहीहांडी, मोहरम आणि इतर जे काही सण आहेत. हे सुरळीत पार पाडले पाहिजे, यासाठी गणेशोत्सवच्या आगमन आणि विसर्जनाच्या मार्गावरचे खड्डे असतील. ते तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देखील संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. जेणे करून गणेश मंडळांची कोणतीही गैरसोय होणार नाही.

 

 

 

Related posts

पूरग्रस्त गावे ४-५ दिवसांत चकाचक होतील !

News Desk

“माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच” – एकनाथ खडसे

News Desk

आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार!

News Desk