HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकर यांचे वर्चस्व

मुंबई । मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवित सर्वच्या सर्व २१ जागांवर दमदारपणे विजयी झाले आहेत. प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व २१ जागांवर विजयी झाले आहेत. यातील १७ जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरीत चार जागांची मतमोजणी काल (३जानेवारी) पार पडली. या चारही जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. मुंबईतील सहाकारी चळवळीतील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा सहकार पॅनेलवर मोठ्या प्रमाणावर सार्थ विश्वास दाखविल्यामुळे हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दिली आहे.

काल चार जागांसाठी झालेल्या मतमोजणीत दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून  विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मते तर सुखदेव चौगुले यांना १६ मते मिळाली.  प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मते तर कमलाकर नाईक यांना ५९ मते मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मते तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मते मिळाली. 

भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल  ४ हजार  मते मिळाली तर,  यलाप्पा कुशाळकर यांना ३५० मते मिळाली. प्रविण दरेकर यांच्या पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.

मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

जनतेच्या विश्वासाचा विजय विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर 

मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्या नेतृत्वावर व सहकार पॅनेलवर विश्वास टाकत २१ पैकी २१ जागा निवडून दिल्या आहेत. त्याबद्दल मी सर्व मुंबईकरांचे, सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सर्व मुंबईकर, सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.  प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, सर्व मुंबईकरांनी जाती-धर्माच्या पलीकडे व पक्षाच्या पलीकडे जाऊन मुंबई बँकेच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आमच्या सहकार पॅनेलवर विश्वास दाखवला. येणाऱ्या काळात मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई बँकेला ताकद, उर्जितावस्था देत महाराष्ट्रात मुंबई बँकेचे मुंबईसह महाराष्ट्रात सर्वोच्च स्थान राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

  बिनविरोध विजयी झालेले १७ उमेदवारनागरी सहकारी बँक

१) आमदार प्रविण यशवंत दरेकर

२) संदीप सीताराम घनदाटपगारदार सहकारी संस्था

३) आमदार प्रसाद मिनेश लाडनागरी सहकारी पतसंस्था

४) शिवाजीराव विष्णू नलावडे गृहनिर्माण संस्था

५) आमदार सुनील राजाराम राऊत

६) अभिषेक विनोद घोसाळकरमजुर सहकारी संस्था

७) आमदार प्रविण यशवंत दरेकर

८) आनंदराव बाळकृष्ण गोळेऔद्योगिक सहकारी संस्था

९) सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे

१०) विष्णू गजाभाऊ घुमरेइतर सहकारी संस्था

११) नंदकुमार मानसिंग काटकर

१२) जिजाबा सीताराम पवारव्यक्तिगत (वैयक्तिक)

१३) सोनदेव बाळाजी पाटीलमहिला राखीव मतदार संघ

१४) शिल्पा अतुल सरपोतदार

१५) कविता प्रकाश देशमुखअनुसूचित जाती/जमाती मतदार संघ

१६) विनोद दामू बोरसेइतर मागासवर्गीय मतदार संघ

१७) नितीन धोंडीराम बनकर

आजच्या मतमोजणीत विजयी झालेले उमेदवार


भटक्या जाती,विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघ

१८) अनिल गजरेमहिला सहकारी संस्था मतदारसंघ

१९) जयश्री ताई पांचाळमध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघ (होलसेल कंझ्यूमर्स)

२०) विठ्ठलराव भोसलेप्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघ २१) पुरुषोत्तम दळवी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान !

News Desk

परळीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा एल्गार!

News Desk

राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

News Desk