HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरमध्ये पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची आघाडी, तर संदीप जोशी पिछाडीवर

नागपूर । राज्यात विधानसभा निवडणुकीला आता वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलीच मोठी निवडणूक होत आहे ती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. म्हणूनच संपूर्ण राज्याचे या निवडणूकीच्या निकालाकडे लक्ष आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारी पहिल्या फेरीत 4850 मतांनी पुढे आहेत. तब्बल 12,617 मते मिळवत वंजारी या मतदारसंघात आघाडीवर आहेत. तर नागपूरचे महापौर संदीप जोशी हे 7767 मतांसह पिछाडीवर आहे

राज्यातील यंदाची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरते. महाविकासआघाडी सरकार आणि भाजपने ही निवडणूक आणखी प्रतिष्ठेची बनवली आहे. म्हणूनच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, १ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले. तर आज (३ डिसेंबर) मतमोजणी सुरू आहे. मध्यरात्रीपर्यंत या निवडणुकीचे निकाल येण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकांच्या राजकीय समिकरणांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची ठरत असल्याचेही म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधुदूर्गात विजय मिळणारे राणे म्हणतात नांदेड म्हणजे महाराष्ट्र नव्हे

News Desk

अशा चौकशा लावून विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला तर…

News Desk

कोल्हापुरात नामचीन गुंडांकडून नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

News Desk