HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : आजपासून पुण्यात तीन दिवस बाजारपेठा बंद, तर घरोघरी जाऊन करणार सर्वेक्षण

पुणे । कोरोनाचा प्रादुर्भावा पुण्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशने काल (१६ मार्च) घेतला आहे. या निर्णयानुसार लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठेसह शहरातील सर्व बाजारपेठा आज (१७ मार्च) ते गुरुवारी (१९ मार्च) बंद ठेवणार आहे. यात औषध, अन्नधान्य-भाजीपाल्याची दुकाने वगळता शहरातील सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच बाजारपेठा बंद राहणार न आहेत.

मुंबईमध्ये रविवारी (१५ मार्च) जमावबंदी लागू केल्यानंतर आता पुण्यातही कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता संचारबंदीचा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला. या ठिकाणांमध्ये पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे. पुण्यातील तुळशीबाग येथे विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पुण्यातील सर्व नागरिक गर्दी करतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून पुण्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने १२५ पथके तयार केली असून एका पथकामध्ये ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला देण्याचे कामही पथक करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले तर, महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होणार नाही

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन; पूरस्थितीची आज पाहणी करणार

Aprna

धवलसिंहांनी बिबट्याला टिपलं तसं आता भाजपला टिपणार – धीरज देशमुख

News Desk