मुंबई। शिवसेनेचा दसरा मेळावा, शुक्रवारी षण्मुकानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणात कोण-कोणत्या मुद्द्यावर बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष्य होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी पुन्हा येणारे म्हणणारे आता म्हणतायंत मी गेलोच नाही. सत्तेऐवजी लोकं महत्वाचे आहेत. मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे. मी टिप्पणी करत नाही, मी तुमच्यासाठी बोलतो.’ मुख्यमंत्र्यांनी या भाषणात अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपला टोला लगावला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कशाचा कशाला धागाच जुळत नव्हता.’
सहानभूतीची लाट चिंतामण वगनांच्या पाठिमागे असूनही चिंतामण वनगांचा मुलगा पडला
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘दसऱ्याच्या दिवशी बहुथा त्यांना लवकर शिमगा आला असं मुख्यमंत्र्यांना वाटल्यामुळे आज जेवढा म्हणून केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा केला. प्रामुख्याने त्यांच्या दोन-तीन मुद्द्यावर बोललं पाहिजे. पंढरपूर आणि देगलूरसाठी उमेदवार बाहेरून आणावा लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर तुमची जरा यादी वाचा. अब्दुल सत्तार कुठून आले? चिंतामण वनगा भाजप विद्यमान खासदार गेल्यानंतर तुम्ही चक्क त्यांचा मुलगा पळवला. पराभव झाला हा भाग वेगळा. कारण लोकांना ते मान्य नव्हतं. सहानभूतीची लाट चिंतामण वगनांच्या पाठिमागे असूनही चिंतामण वनगांचा मुलगा पडला.’
सत्तेच्या माध्यमातून विकास करता येत नाही
‘तुम्ही शिवसेनेला जागा घेतली आणि भाजपचा उमेदवार घेतला. इकडे गौरव नायकवडीला घेतले. कराडाला धैर्यशीलला घेतले. कोरेगावला महेशला घेतले. अशी मोठी यादी आहे. जिथे जागा शिवसेनेची तिथे उमेदवारी भाजपचा. पण आम्ही याच्यात चुकीच काही म्हटलं नाही. शेवटी राजकारणात सत्ता मिळवणं हे महत्त्वाचं. घटनेमध्ये सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्यांच्या हातात तिजोरीची किल्ली जाते. त्याच्यामुळे ती सत्ता मिळवल्याशिवाय सत्तेच्या माध्यमातून विकास करता येत नाही,’ असे पाटील म्हणाले.
आजच्या भाषणामध्ये कशाचा कशाला धागाच जुळत नव्हता
स्वातंत्र्यलढ्यामध्ये? असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यामध्ये कुठे होते यांच्यासाठी इतिहास वाचावा लागतो. तुम्ही कुठे होता, तुमचा जन्मही झाला नव्हता. शिवसेना नव्हती स्वातंत्र्यलढ्यामध्ये तुम्हाला इतिहास माहित नाही. १९२५ आरएसएसची स्थापना झाल्यानंतर संघ वाढवता वाढवता डॉ. हेडगेवारांनी स्वातंत्र्य प्रखर व्हायला लागले. तेव्हा काही वर्ष संघ स्थगित ठेवला. स्वयंसेवकांना आवाहन केलं, मी स्वतः स्वातंत्र्यलढ्यात उतरणार आहे. मुळात डॉ. केशव बळीराम हेडगेवार संघाच आदरणीय सरसंघचालक हे चांगले स्वातंत्र्यसैनिक होते, क्रांतिकारी होते. जरा इतिहास वाचा. त्यांनी काही वर्ष संघ स्थगित ठेवला आणि लढ्यात तुम्ही उतरा असे स्वयंसेवकांना आवाहन केले होते. त्यानंतर पुन्हा संघाची सुरुवात केली. मग आणीबाणीत तुम्ही कुठे होता? आणीबाणीत इंदिरा गांधींनी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. हजारो पत्रकार जेलमध्ये गेले. लाखो स्वयंसेवक संघ, लाखो लोकं जेलमध्ये गेले. आजच्या भाषणामध्ये कशाचा कशाला धागाच जुळत नव्हता.’
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.