HW News Marathi
महाराष्ट्र

भुजबळ, वडेट्टीवार राजीनामा द्या, ओबीसी आरक्षणासाठी उद्या भाजप ओबीसी मोर्चाचे आंदोलन

मुंबई | मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ ओबीसी आरक्षणावरही गदा आली आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्याच आरोप केला जात आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली आहे. तसेच राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या (३ जून) राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही ओबीसी मोर्चाने केली आहे.

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आज (२ जून) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याने उद्या गुरुवारी ओबीसी मोर्चाच्यावतीने संपूर्ण राज्यात आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. लॉकडाऊनचे सर्व निर्बंध पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं योगेश टिळेकर यांनी सांगितलं.

मंत्र्यांना फिरू देणार नाही, लोकांना इशारा

येत्या महिनाभरात राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी करतानाच मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’, पंढरपूर निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

News Desk

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावी – राजू शेट्टी

News Desk

“अहो त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय…” अजित पवारांनी दिला प्रेमळ दम

News Desk