HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती!

नागपूर। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. ईडी आणि सीबीआयकडून छापेमारी करण्यात आल्यावर देशमुखांच्या मालमत्तांवर शुक्रवारी आयकर विभागाने धाड टाकली. आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझडती करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी शुक्रवारी दाखल झालेल्या आयकर विभागाच्या टीम शनिवारी पहाटे झाडाझडती करुन निघाल्या.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे.

त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते

यासोबतच आज आणि उद्या देखील अनिल देशमुख यांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी आणि झाडाझडती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.अनिल देशमुख यांच्या घरी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या.

आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही – अनिल परब

News Desk

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला प्राणघातक हल्ला; रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

Aprna

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Aprna