नवी दिल्ली | कोरोनाचा फैलाव देशात वेगाने वाढताना दिसत आहे. देशात आज (६ एप्रिल) कोरोना बाधितांचा आकडा ४००० पार गेला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशात सध्या स्थितीला ३२८ जणांची कोरोनाशी यशस्वी झुंज देते कोरोनामुक्त झाले आहे. तसेच देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे ११८ जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळली आहे.
Increase of 490 #COVID19 cases in the last 12 hours, India's positive cases cross 4000 mark – at 4067 (including 3666 active cases, 292 cured/discharged/migrated people and 109 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/d5xHg53Y3M
— ANI (@ANI) April 6, 2020
देशात सर्वाधिक कोरोना महाराष्ट्रात असून त्यांची संख्या ७४८ आहे. तर दुसऱ्या क्रमांक तामिळनाडू , तिसऱ्या क्रमांक दिल्ली, चौथ्या क्रमांक तेलंगाना, पाचव्या क्रमांकावर केरळ आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत जात आहे. यामुळे सध्या देशात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे
देशातील कोणत्या राज्यात किती कोरोना बाधित
- महाराष्ट्र – ७८१
- तामिळनाडू – ५७१
- दिल्ली – ५०३
- तेलंगाना – ३३४
- केरळ – ३१४
- उत्तर प्रदेश – २७८
- राजस्थान – २७४
- आंध्र प्रदेश – २५२
- मध्य प्रदेश – १९३
- कर्नाटक – १५१
- गुजरात – १४४
- जम्मू-काश्मीर – १०६
- हरियाणा – ९०
- पश्चिम बंगाल – ८०
- पंजाब – ६८
- ओडिशा – ३९
- बिहार – ३२
- असम – २६
- उत्तराखंड – २६
- चंदीगड – १८
- लडाख – १४
- हिमाचल प्रदेश – १३
- अंदमान-निकोबार- १०
- छत्तीसगढ – १०
- गोवा – ७
- पुदुच्चेरी – ५
- झारखंड – ५
- मणिपूर – २
- अरुणाचल प्रदेश – १
- मिजोरम – १
एकूण – ४३४७
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.