HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

मुंबई । यंदा राज्याच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष होते. महाविकासआघाडी आणि भाजपमुळे ही लढत मोठी प्रतिष्ठेची झाली. दरम्यान, महाविकासआघाडीने या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का दिल्याचे दिसते. मात्र, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला अशा दोघांनाही धक्का देत वाशिम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक यांनी विजय मिळवला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव करत किरण सरनाईक हे विजयी झाले आहेत. अंतिम फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांची मते 15 हजार 606 वर पोहोचल्याने कोटा पूर्ण झाला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांनी किरण रामराव सरनाईक हे विजयी झाल्याची घोषणा केली. दरम्यान आपल्या विजयानंतर किरण सरनाईक यांची प्रतिक्रियाही आली आहे.

“मी शैक्षणिक विभागात असलेल्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया अमरावतीचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रिया सुळेंनी असा साजरा केला धनंजय मुंडे यांचा वाढदिवस…

News Desk

“मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे”, राम कदमांची ती ऑडिओ क्लिप वायरल 

News Desk

हरीण चाललं पंढरपूरला, विठूरायाच्या दर्शनाला

News Desk