नवी दिल्ली | देशात गेल्या २५ तासांत ९५,७३५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ११७२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशात एकूण रुग्ण संख्या ही ४४,६५,८६४ इतकी झाली आहे. तरराज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
Single-day spike of 95,735 new #COVID19 cases & 1,172 deaths reported in India, in the last 24 hours.
The total case tally stands at 44,65,864 including 919018 active cases, 3471784 cured/discharged/migrated & 75062 deaths: Ministry of Health pic.twitter.com/eaRLQHDesZ
— ANI (@ANI) September 10, 2020
दरम्यान राज्यात २३,८१६ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज राज्यात २३,८१६ नवीन रुग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९,६७,३४९ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,५२,७३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज १३,९०६ रुग्ण बरे होऊन घरी परत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६,८६,४६२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ७०.९६ % एवढं झालं आहे.
राज्यात आज 23816 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13906 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 686462 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 252734 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.96% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.