HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र

देशात ८६,९६१ नवे रुग्ण तर राज्यात २६,४०८ रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली | देशात रुग्ण वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६,९६१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ११३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडा आता ५४,८७,५८१ इतका झाला आहे. आत्तापर्यंत ४३,९६,३९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ८७,८८२ रुग्णांचा आत्तापर्यंत देशात मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०,५९८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात २६,४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात राज्यात ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर हा २.७ टक्के झाला आहे.

राज्यात रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ८,८४,३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२४१ रुग्णांची कोरोना चाचणी झाली असून १२,०८,६४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

Related posts

शक्तिकांत दास यांची आरबीआयच्या नव्या गव्हर्नर पदी नियुक्ती

News Desk

कंगना म्हणजे भाजप आयटी सेल, सचिन सावंतांचा गंभीर आरोप

News Desk

कोणतीही पुर्वकल्पना न देता केंद्राने हटवली शरद पवारांची सुरक्षा

rasika shinde