HW News Marathi
Covid-19

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घट

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत 1 लाख 52 हजार 734 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 3 हजार 128 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 52 हजार 734 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 128 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 38 हजार 22 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

 

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात आज 18,600 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 22,532 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 53,62,370 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2,71,801ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.55% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांची मंत्रालयात गरज, मात्र मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायला हवं !

News Desk

सिरमच्या नवीन कोव्होव्हॅक्स कोरोना लसीने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला टाकले मागे

News Desk

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू | राजेश टोपे

News Desk