HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रूग्ण संख्या परत घटली, बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 32 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 713 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 7 हजार 71 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

 

महाराष्ट्रातील स्थिती काय?

मागच्या 24 तासात 25 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 15 हजार 229 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 54 लाख 86 हजार 206 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.73 टक्के एवढं झालं आहे.

राज्यात एका दिवसात 307 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.68 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 2 लाख 4 हजार 974 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मुंबईत 961 नवे रूग्ण आढळले आहेत. आणि 897 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात १९,१४८ नव्या रुग्णांची भर

News Desk

फेसबुक, ट्विटरवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?,” सेनेचा टोला

News Desk

दिलासादायक! देशात आत्तापर्यंत ८३२४ कोरोनामुक्त

News Desk