HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट, ५० हजारांच्या घरात आढळले नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत हा आकडा ५४ हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात ५३ जार २५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ४२२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत २,९९,३५,२२१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २,८८,४४,१९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ३,८८,१३५ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७ लाख ०२ हजार ८८७ बाधित रुग्णांवर उपचार सूरु आहेत.

महाराष्ट्राची स्थिती काय?

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९३६१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९१०१ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,१९,४५७ इतकी झाली आहे. तर १९० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown3 : देशातील लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला

News Desk

“कंगनाविरुद्धच्या शिवसेनेच्या आंदोलनाला परवानगी, मग ‘मनसे’ला नोटीस का ?”

News Desk

विद्यार्थी, श्रमिक आपापल्या घरी लवकर पोहोचणार

News Desk