नागपूर | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यापासून देशभरात ज्या चर्चांना ऊधान आले होते त्यांना आता अखेर पुर्ण विराम मिळाला आहे. मी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडणार आहे अस बोलत माजी राष्ट्रपतींनी भाषणाची सुरुवात केली. भारत स्वतंत्र विचारांचा देश असून देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती आहे व भेदभाव, तिरस्कार करत राहिल्यास जगात भारताची प्रतिमा बिघडेल अस मत प्रणव मुखर्जींनी व्यक्त केले.
Any attempt at defining our nationhood in terms of dogma and identities or religion, region, hatred and intolerance will only lead to dilution of our identity: Dr Pranab Mukherjee at RSS's Tritiya Varsh event in #Nagpur pic.twitter.com/wHpClA0Cde
— ANI (@ANI) June 7, 2018
भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित, त्यामुळे भारताचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. विविधतेत एकता हेच भारताचे सौंदर्य आहे. भारतातूनच जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला असल्याचे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.
#WATCH Former President Dr Pranab Mukherjee speaking at RSS's Tritiya Varsh event, in Nagpur https://t.co/REkQkhbYLG
— ANI (@ANI) June 7, 2018
राष्ट्रवाद कोणत्याही एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नसतो. भारतावर अनेक हल्ले झाले, राजवटी आल्या, तरीही भारतीय संस्कृती अबाधित आहे. विविधता, सहिष्णुता यांच्यामध्ये भारत वसलेला आहे. हेच गेल्या ५० वर्षांपासून शिकत आलो आहे. भारतातील विविध वर्ण, धर्म, भाषा हीच भारताची खरी ओळख आहे.
Our national identity has emerged after a long drawn process of confluence and assimilation, the multiple cultures and faiths make us special and tolerant: Pranab Mukherjee at RSS's Tritiya Varsh event in Nagpur pic.twitter.com/CbRNQ7QYyx
— ANI (@ANI) June 7, 2018
सात धर्म, १२२ भाषा, १६०० बोली भाषा , तरीही १३० कोटी व्यक्तींची ओळख भारतीय म्हणूनच आहे आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सर्वांनी मिळून भारताची खरी ओळख होते. तसेच संविधानामुळे राष्ट्रीय भावना ही अधिक दृढ होत असते असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज संघाचा कार्यक्रमात व्यक्त केले.
It was this very nationalism that Pandit Nehru so vividly expressed in the book 'Discovery of India', he wrote, "I am convinced that nationalism can only come out of the ideological fusion of Hindu, Muslims, Sikhs and other groups in India.": Dr Pranab Mukherjee in Nagpur pic.twitter.com/hetZaDD1w6
— ANI (@ANI) June 7, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.