मुंबई | देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. २४ तासांत तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९० हजार ४०१ वर गेले आहे. तर त्यापैकी १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात १५ हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आज (२५ जून) दिली आहे.
407 deaths and highest single-day spike of 17,296 new #COVID19 positive cases reported in India in the last 24 hours.
Positive cases in India stand at 4,90,401 including 1,89,463 active cases,2,85,637cured/discharged/migrated & 15301 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/g8EjQz2UwA
— ANI (@ANI) June 26, 2020
दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला दिलासादायक बाबा म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात २५ जूनपर्यंत ७७ लाख ७६ हजार २२८ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर २५ जून रोजी देशभरात कोरोनाच्या २ लाख १५ हजार ४४६ चाचण्या घेण्यात आल्या.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रामध्ये काल (२५ जून) कोरोनाच्या तब्बल ४ हजार ८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एका दिवसात राज्यात झालेली रुग्णांची ही सर्वाधिक नोंद होती. दिवसभरात राज्यात १९२ जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली. मात्र यामध्ये आधीच्या ८३ मृत्यूंचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ४७ हजार ७४१ वर पोहोलची आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.