HW News Marathi
महाराष्ट्र

भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान मनसेचा नवीन झेंडा फडकला

पुणे | भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याच्या दरम्यान मनसेचा नवीन भगवा झेंडा महाराष्ट्र सैनिकांनी स्टेडियम मध्ये फडकावला. मनसेच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे या नव्या झेंड्यामार्फत दिसत आहे. इतकेच नव्हे तर पक्षाचा झेंडा भगव्या रंगात दिसणार असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगवी होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलणार आहे.

मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं जुनं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचं इंजिन) नसेल. मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गावर येत असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देताना दिसत आहे.

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे येत्या २३ जानेवारीला मनसेच्या महाअधिवेशनात या नवीन झेंड्याची घोषणा करतीलच. पण त्याआधीच काल भारत श्रीलंका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान महाराष्ट्र सैनिकांनी चक्क हा नवीन झेंडा स्टेडियममध्ये फडकावला आहे या झेंड्याकडे मनसे सैनिकांसह महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तींचे लक्ष लागले आहे. येत्या २३ जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे या झेंड्याचं अनावरण करणार का? तसेच या अधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का? हे येत्या २३ जानेवारीला स्पष्ट होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

“शरद पवारांबाबतची अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही”, लंकेंनी घेतला पडळकरांचा समाचार

News Desk

निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल पण…! । शरद पवार

News Desk