नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही तासागणिक कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ६७ हजार १५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात १ हजार ५९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३२ लाखांच्याही पार गेला आहे. आतापर्यंत देशात ३२ लाख ३४ हजार ४७५ एकूण कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत तब्बल ५९ हजार ४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India's #COVID19 case tally crosses 32 lakh mark with 67,151 fresh cases and 1,059 deaths in the last 24 hours.
The COVID-19 case tally in the country rises to 32,34,475 including 7,07,267 active cases, 24,67,759 cured/discharged/migrated & 59,449 deaths: Ministry of Health pic.twitter.com/pfoJqCg2FY
— ANI (@ANI) August 26, 2020
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहावा यासाठी देशात सुरुवातीला केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे रखडलेले देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. सध्या देशात अनलॉक ३ लागू असून येत्या १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’च्या प्रक्रियेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी टप्प्याने अनलॉक केले जात आहे. मात्र, असे असताना कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. एक अत्यंत दिलासादायक बाब अशी कि देशात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडाही वाढत आहे. देशात तब्बल २४ लाख ६७ हजार ७५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.