HW News Marathi
देश / विदेश

भारताचे ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

मुंबई । भारताचे ‘फ्लाईंग सिख’ असलेले महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बुधवारी (१६ जून) मिल्खा सिंग यांना जनरल ICU मध्ये ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर अचानक आलेला ताप आणि ऑक्सिजन पातळीत झालेली घसरण यामुळे मिल्खा सिंग यांची प्रकृती खालावली. ते मोहालीतील एका रुग्णालयात दाखल होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

मिल्खा सिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ७ ते ८ दिवसांच्या उपचारानंतर मिल्खा सिंग कोरोनामुक्त होऊन घरीही आले होते. परंतु, त्यानंतर पुन्हा त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. निश्चितच मिल्खा सिंग यांच्यासारख्या एका महान खेळाडूच्या निधनानंतर देशात सर्वच स्तरांत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

२० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये मिल्खा सिंग यांचा जन्म झाला. त्यावेळी भारत-पाकिस्तान फाळणी होणे बाकी होते. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकणारे मिल्खा सिंग हे एकमेव भारतीय खेळाडू ठरले. पुढेमिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये मिल्खा सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रोमधून अपहरण करून तरुणीवर बलात्कार

News Desk

विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढा – मोदी

News Desk

‘राजेशाही’ असती तर गोयलला दाखवलं असतं,उदयनराजेंची भाजप नेत्याला धमकी!

Arati More