HW News Marathi
महाराष्ट्र

माझे सध्या वाईट दिवस, चांगले काम करताना त्रास होतो !

बीड। माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना त्रास होतोय, अशी प्रतिक्रिया वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील कड्याजवळच्या कुंभारवाडीत काल (१६ फेब्रुवारी) दुपारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना एवढा त्रास होतो. या विषयावर आता मला काहीच बोलायचे नाही, असे मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले. या कीर्तनावेळी काही लोकांच्या हातात ‘आय सपोर्ट इंदुरीकर’, ‘महाराज आम्ही तुमच्यासोबत आहोत’ अशा आशयाचे फलक दिसून आले.

इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे वादग्रस्त विधान केले होते. नातून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने ही नोटीस पाठवली आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक

News Desk

कृषी कायद्याबाबत मोदी सरकार कोर्टाचीही दिशाभूल करेल, राजू शेट्टींचा आरोप

News Desk

महाडमध्ये मोठी दुर्घटना, तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू…!

News Desk