HW News Marathi
महाराष्ट्र

धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त- इंदुरीकर महाराज

अहमदनगर | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यानंतर आता मुंडे यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ संपत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे-रेणू शर्मा हा वाद मिटत असतानाच मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर येत आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन नुकतेच संपले होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.

संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे हे मंदिरात गेले होते. तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. हे समजताच धनंजय मुंडे श्रोत्यांच्या गर्दीत जाऊन बसले आणि इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकत बसले. यावेळी बोलताना धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. तसेच, संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे किरीट सोमय्यांवर आरोप

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप गंमत बघत बसले, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

News Desk

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मध्य प्रदेशात पंकजा मुंडेंच्या मॅरेथॉन सभा

News Desk