HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#CoronaVirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे !

मुंबई | देशावर कुठलेही संकट आल्यास उद्योग क्षेत्र नेहमीच मदतीसाठी पुढे येते. सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे असून यावर मात करण्यासाठी उद्योगांनी आरोग्याशी निगडीत साधन-सामुग्रीचा शासनाला पुरवठा करावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात संचारबंदी जारी करण्यात आलेली असून यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून काही उद्योगांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक वस्तुनिर्मितीसह माहिती तंत्रज्ञान व अनुषंगिक सेवा, कृषी व अन्न प्रक्रिया आधारित उद्योग,  दाळ व राईस मिल,  डेअरी उद्योग,  खाद्य व पशुखाद्य उद्योग यांचा समावेश आहे. अशा संकटप्रसंगी  सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

 यासाठी समन्वयक म्हणून मराठी  भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे  ([email protected]) याशिवाय  उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी ([email protected]), उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे ([email protected]), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्वलगन ([email protected]), मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील समन्वयक प्रधान सचिव भूषण गगराणी ([email protected]), अन्न व औषध प्रशासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी ([email protected]) यांच्याशी संपर्क करावा,  याशिवाय [email protected] या इमेलवर देखील संपर्क साधावा, असेही देसाई यांनी सांगितले आहे

Related posts

दानवे विरोधात शिवसैनिकांनी केले ” जोडे मारो आंदोलन “

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

अपर्णा गोतपागर

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे भव्य यात्रा महोत्सव

News Desk