HW News Marathi
महाराष्ट्र

‘अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश’ -धनंजय मुंडे

मुंबई। औरंगाबाद जिल्ह्यातील अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले.

अतिथीगृहावर बैठक

मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या एम.आर.पिंपरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त

यावेळी बैठकीत “आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या माध्यमातून बौद्धकालीन चित्रांचे जतन करणे गरजेचे आहे. अंजिठा-वेरुळ या पर्यटनस्थळाला आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल,” असे मुंडे म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र विकसित करण्यासाठी अंजिठा-वेरुळ परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या उपलब्ध जागेचा विचार करता येईल. या प्रकल्पासाठी जागेची निश्चिती करुन तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

8 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार

‘सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून रु. 8 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. कोल्हापूरकरांचे शक्तिस्थळ असलेल्या राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी तात्काळ आर्थिक मदत केल्याबद्दल दोन्ही मंत्री महोदयांचे मनापासून आभार. याबाबतचा प्रस्ताव आजच कोल्हापूर समाज कल्याण विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या या समाधीस्थळाचे गेल्या वर्षी मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे’, असं ट्वीट कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk

‘प्रताप सरनाईकांविरोधात सध्या कोणतीही कारवाई करु नका’, हायकोर्टाचा आदेश!

News Desk

‘प्रयास’च्या सायकल रॅली माध्यमातून वाहतूक नियम आणि आरोग्याविषयी जनजागृती

News Desk