HW News Marathi
महाराष्ट्र

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. चिदंबरम यांना १ लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. देशा बाहेर न जाण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण जामीन मंजूर झाल्यानंतरही चिदंबरम यांना जेलमध्ये राहावे लागणार आहे. कारण २४ ऑक्टोबरपर्यंत ते अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कस्टडीमध्ये आहे.

नमके काय आहे प्रकरण

चिदंबरम हे अर्थमंत्री असतानाच्या काळात आयएनएक्स मीडियामध्ये विदेशातून ३०५ कोटी रुपयांचा निधी गुंतवण्यात आला होता. याबाबतच्या प्रस्तावाला चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील एफआयपीबीने मंजुरी दिली होती. चिदंबरम यांच्या पुत्राच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ताब्यात असलेल्या कंपन्यांद्वारे विदेशातून हा निधी भारतात आणण्यात आला असल्याचा दावा तपास सीबीआयनी केला आहे. आयएनएक्स मीडीया घोटाळ्याप्रकरणी दिल्‍ली उच्च न्यायालयाने २५ जुलै २०१८ रोजी चिदंबरम यांना अंतरीम जामीन दिला होता. त्यानंतर वारंवार त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. मात्र, यावेळी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुन्हा महाराष्ट्रात आणि मुंबईत घडला, त्यामुळे महाराष्ट्र सरकारची एनओसी घ्यावी – अनिल परब

News Desk

ओबीसी जनगणनेवर सत्ताधारी-विरोधकांचे एकमत, विधानसभेत कोण काय म्हणाले

swarit

देशमुखांची चौकशी करणं राज्य सरकारनं हेतूपूर्वक टाळलं ?

News Desk