मुंबई | देशात एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने चिंता वाढत आहे तर दुसरीकडे राजकारण्यांचे वेगळेच राजकारण सुरु आहे. सध्ये देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. ज्यात कोणाला कुठेही अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडण्याची मनाई आहे. अशातच, येस बॅंक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीयांना सुट्टीसाठी प्रवास करण्याची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तातडीने हा निर्णय घेतला. त्या संदर्भातील ट्विटही त्यांनी रात्री उशिराने केले आहे.
As per discussion with Hon. CM, Mr Amitabh Gupta, Principal Secretary (special), has been sent on compulsory leave with immediate effect, till the pending of enquiry, which will be initiated against him.#LawSameForEveryone
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
संचारबंदीच्या काळात वाधवान कुटुंबातील २३ जण ७ गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघडकीस आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना याची परवानगी गृह मंत्रालयाचे विशेष सचिव यांच्याकडून पत्राद्वारे ही परवानगी दिल्याचेही समोर आले. दरम्यान, या परवानगी वरुन विरोधी पक्षांच्या नेत्याकडून ताशेरे ओढण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सातारा पोलीस अधिक्षकांना वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
वाधवान कुचुंबावर येस बॅंकेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामूळे त्यांना परवानगी शिवा कोठेही जाण्यास मनाई आहे. त्यातची कोरोनामूळे लॉकडाऊन असल्याकारणाने कुठेही जाण्यास बंदी आहे. परंतू, लॉकडाऊनचा काळ हा सुट्टीचा काळ असल्यासारखा त्यांनी गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांच्याकडून परवानगीचे पत्र मिळवत २३ जणांसह महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेले. सध्या या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.