HW News Marathi
महाराष्ट्र

हेमंत नगराळे यांची  महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी

मुंबई | गेले अनेक दिवस महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याच्या चर्चा सुरु होत्या त्याला आता पुर्णविराम लागला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत होती. परंतु नगराळे यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते.

हेमंत नगराळेंची माहिती

हेमंत नगराळे हे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

महासंचालक पदाच्या शर्यतीत कोणाची नावे होती?

१) संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड

२) हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान

३) सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग

४) रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार अशा चर्चा होत्या. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोधकुमार जैस्वाल यांची आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंगांचे भाजप नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधींची राजकीय वर्तुळात चर्चा!

News Desk

कृषी कायद्याबाबत मोदी सरकार कोर्टाचीही दिशाभूल करेल, राजू शेट्टींचा आरोप

News Desk

महाविकासआघाडीत पुन्हा बिघाडी? कॉंग्रसे नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

News Desk