HW News Marathi
देश / विदेश

IPS सुबोधकुमार जयस्वाल CBI चे नवे संचालक

मुंबई । IPS अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला आहे. सुबोध जयस्वाल यांनी यापूर्वी महाराष्ट्र पोलिस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) जारी केलेल्या आदेशानुसार सुबोध जयस्वाल हे लवकरच सीबीआयच्या संचालकपदाचा ताबा घेतील. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच ऋषी कुमार शुक्ला यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत सीबीआयचे संचालक पद रिक्त होते. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा अंतरिम प्रमुख म्हणून मुख्य तपास यंत्रणेचे काम पहात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

News Desk

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलनाचे रणशिंग- बाळासाहेब थोरात.

Arati More

टाईम मॅक्झिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश

News Desk