HW News Marathi
महाराष्ट्र

इस्लामपूरात ३ दिवसांचा लॉकडाऊन, मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकान बंद राहणार

सांगली | सांगलीत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सद्यस्थितीला सांगलीत एकूण २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, या रुग्णांच्या सानिध्यात आलेले एकूण ३३३ नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती काल २८ मार्च) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. कोरोना विषाणूचा सांगतील होत असलेला हा फैलाव लक्षात घेता इस्लामपूर शहर आजपासून (२९ मार्च) ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, हा निर्णय नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. मुख्य बाब म्हणजे या तीन दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात फक्त मेडिकलचे दुकान हे दिवसाआड सुरु राहणार आहेत तर बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

अत्यावश्यक बाब असलेले मेडिकल विषम तारखेला सुरू राहतील. मेडिकल सुरू न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे परवानेही रद्द केले जातील. तसेच, दुध, भाजीपाला, किराणा मालाची दुकानेही बंद असणार आहेत. सांगलीतील २५ कोरोनाबधित लोकं जवळपास ४०० लोकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामूळे कोरोनाबाधित राहत असलेला शहरातील साडेतीन किलोमीटर अंतराचा परिसर हा सील करण्यात आला आहे. यात ११ हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. २७ इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. याशिवाय येत्या तीन दिवसात इस्लामपूर शहराच्या व शहरातील प्रभागांच्या सीमा बंदिस्त केल्या जाणार आहेत.

कोरोनाच्या वाढच्या संख्येला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यात ३ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जेजे हॉस्पीटलच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. ही तीन सदस्यीय समिती सांगलीमध्येच राहून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. दरम्यान, कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवणार असल्याची माहिती पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

News Desk

पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या,आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर काम, मुख्यमंत्री!

News Desk

शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग घसरत चाललाय, शेलारांचा सेनेला टोला

News Desk