May 24, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण लोकसभा निवडणुक 2019

तिढा सुटला ! वैद्यकीय महाविद्यालयातील मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा अध्यादेश जारी

मुंबई । मराठा समाजातील वैद्कीय महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात निर्माण झालेला पेच सोडवण्याची मागणी करीत गेल्या १० दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानवर धरणे आंदोलनाला बसले होते. या संदर्भात आत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजातील या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत झालेले प्रवेश तसेच कायम राहणार असल्याच राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भातील माहीती दिली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढवून देण्याबाबत केंद्र सरकारकडे मागणीही करण्यात आल्याची माहीती देण्यात आली आहे.

राज्य सराकरच्या या निर्णयामुळे १९६ पीजी आणी २२ डेंटल पीजी च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा सुटला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही अशा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल असही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

 

 

Related posts

ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडेदर ठरविण्यासाठी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा 

News Desk

एकनाथ खडसेंवर विनयभंगाचा गुन्हा?

News Desk

अ कृषी जमिनीसाठीची अट शिथिल

News Desk