HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार घड्याळ सोडून हातात शिवबंधन बांधणार

ठाणे | ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. १९८० पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने अखेर पक्षासोबत फारकत घेतली. बरोरा उद्या (१० जुलै) शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी नेते म्हणून पाहिले जात होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादची होत असलेली पिछेहट आणि भाजप नेत्यांचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊनच बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधणार आहे. आगामी ३ ते ४ महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संकेतस्थळाचे लोकार्पण

News Desk

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांंना सुनावले!

News Desk

अवघ्या १८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद!

News Desk