HW News Marathi
Covid-19

लाॅकडाऊनमध्ये सूट देणे पुणेकरांना परवडणार नाही !

पुणे । पुण्यात आजपासून (४ मे) अत्यावश्यक सेवेसह लेनमधील ५ दुकाने सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मात्र, या निर्णयाला आपला विरोध असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकरांनी सुरुवातीचे २ दिवस लॉकडाऊनचे नियम व्यवस्थित पाळलेले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असतानाही नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत, असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयानंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मोहोळ यांनी ट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर, मोहोळ यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा केली आहे.

अजित पवार यांच्याशीही आपले बोलणे झाले असून त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. त्याचप्रमाणे, या प्रकरणी हस्तक्षेप करुन अजित पवार तातडीने निर्णय घेतील, अशी देखील अपेक्षा, महापौर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. “केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन त्याची वेळ सकाळी १० ते दुपारी २ इतकी असावी, ही माझी मागणी सर्व प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी”, अशी मागणी महापौर मोहोळ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर , त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

“आज सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही स. १० ते दु. २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात, अशी माझी मागणी आहे. शिवाय नव्या आदेशानुसार १० ते ७ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार ?”, असा सवालही मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, “पुण्यात संवेदनशील परिस्थिती असताना लॉकडाऊन शिथिल करायचा असेल तर त्याबाबत पूर्णपणे अंमलबजावणी करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या आदेशामुळे पुणे पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशीही भीती मोहोळ यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आशिष शेलार यांनी केले स्वागत

News Desk

‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? नाना पटोलेंचा सवाल

News Desk

दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी, तर आदेश गुप्तांची नियुक्ती

News Desk