मुंबई। ED ने ससेमिरा मागे लागल्यानंतर काही काळ न दिसणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आता पत्रं लिहिलं आहे. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना शनिवारी पक्षप्रमुख उद्दव ठाकरेंनी स्वबळाची भाषा केल्यास जनता जोड्याने हाणेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता सरनाईक यांच्या पत्राने राजकारणात खळबळ उडाली आहे.
अवैध मालमत्ता प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे . या पत्रामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे . या पत्रात आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी अशी विनंती केली आहे . महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत आहेत . त्यामुळे भाजपशी युती करावी जेणे करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणाचा ससोमिरा टाळता येईल ‘ असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात म्हटलं आहे .
तुटण्याआधी जुळवून घेतलेलं बरं
पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.